Tuesday, June 25, 2013

विवा, विंदा, संपूरनला, डोके खाजवते दुनिया उडत्या बोथट शब्दांनी पोटाचे खड्डे भागवतो

"Ye jaadu mantar kuch nahi hota ,sahab"

"Ye jaadu mantar kuch nahi hota ,sahab Sab khel hai apni apni chamdi bachane ka " 

chai pite pite do logon ki baat chal rahi thi. Aur Chai ki chuski lete huye usne Akhbaar patka tab akhbaar ki headline keh rahi thi " MLA ka Jadu Chal gaya ! "
Sukhe gaav ko Paani ke 3 tanker milne ki khabar thi.
Asal me 30 Tanker muhaiyya kiye they lekin opposition ne halla bol diya to apni jeb se muh band karane ke liye 3 tanker ka dhindora pitwa diya.
 " MLA ka Jadu Chal gaya" Subah ki Chai din ka mood tay karti hai.
Aur Subah ka akhbar us hafte ka. Chai k farrate se pata chal jata hai kon kaunsi Khabar padh raha hai. Aur agar koi Akhaar padhna taal raha hai to samjh lo uske Job ka aaj pehla din hai. Chai ki pehli pyali raste me udel dene ka riwaaz hai chay walo me. ' Pehli chai bhagwan k naam'. Fir us hi raste k gile chai k upar se ik cycle jaayegi apna design banate huye. wo cycle bhi hogi kisi akhbar wale ki. kuch ajeeb rishta hai chai aur akhbar ka.
Chai ki bhaap me samne wala traffic signal tharrata hai dopar ko aur wohi traffic signal raat ko blink hote hote chai ki chuski le raha ho yu lagta hai. kuch naye naye istri kiye kapdo wale log chai pite pite Classified ka page yu padhate hai jaise. shaam ka goverment peon movie review padhta ho. kuch log apne pen se classified ki khabar pe Round karte hai aur kuch log chai ka cup rakh kar gila sa round kar dete hai. Bas yuhi chai ka round kar k kisi ko job mila to usne us din 2 chai pi lee aur 5 k paise de diye. Samne wale office walo k din me sau baar khidki se aawaze aati hai. " abey 7 bhej , 3 bhej , 10 bhej ! " Lekin jab koi keh de Arey 1 bhej ! to samaz liyo aaj raat jyada der tak kaam chalne wala hai. Aaj kal Ladkiya bhi cigarette pite pite chai pine aa jati hai.

Gaav mein aisa nahi tha. Gaav me bas mele me yu hota tha. ik baar `wo' aayi thi aur uske kaan ki baali chai ke bartan mein chamki thi tab se har bar ek chammach shakkar jyada daal ne ki aadat pad gayi hai. Dost kehte the , " Jab se 'Wo' aa k gayi hai teri chai kuch jyada mithi hone lagi hai "

Fir uska aana band ho gaya. ek aakhari baar samnese gujri hamesha hamesha k liye. Aur meri chai ka Mitha chammach band ho gaya. Dost kehne lage " Yaar tere chaai ka jaadu kaha kho gaya saale ? " Tab mene kaha tha "aaj kal Shakkar pehle daam puchti hai fir jayka deti hai . "Aur Ye jaadu mantar kuch nahi hota ,sahab Sab khel hai apni apni chamdi bachane ka  ! "

Monday, May 21, 2012

अलिकडे नाशकात पाऊस कमी का पडतो ? ____________________________________________________________________________________________________________________ पुर्वी वर्गात भुगोलाच्या काटकुळ्या सरांनी प्रश्न विचारला की "सांगा पाऊस कधी येतो ?" सोमीगोमी पोरंसुद्धा एका सुरात म्हणायची "सा.....त...जुन !! " आत विचारलं तर फ़क्त खुसफ़ुस ऐकु येईल किंवा ती पोरं वर्गाच्या तुटक्या खिडकीतुन वर बघतील की "आता पण येऊ शकतो काय भरवसा ? " आधी कसं व्हायचं.... पावसाळा सोप्यामधे आपल्या चपला काढायचे..खुंटीवर आभाळाची टोपी अडकवुन, हातपाय पसरुन नाशकात बि-हाड टाकायचा मामाच्या घरी आल्यासारखा. पावसाआधी सगळं भरुन यायचं.पुलावरुन काळारामाच्या कळसाकडे पाहिलं की आभाळ कुठे सुरु होतं आणि काळ्यारामाचा काळा कातळ कुठे सुरु व्हायचा हे कळायलासुद्धा वेळ लागायचा. गंगेतीरावर नारोशंकराची घंटा गार हवेने हलल्याचा भास व्हायचा. तिकडे त्रंबकराजाला थेंबांचा अभिषेक करुन हळुहळु पुढे ‘अंजनी’सुताची विचारपुस करत पांडवलेण्यांवरचा ‘लव्हबर्ड्स’च्या खुडुबाजी पुसुन टाकायचा.पलीकडुन सप्तशृंगीच्या भुरकट पाय-यांना नवा काळारंग द्यायचा. सगळ्या देवांचे आयास सायास झाले की मग आभाळ दुस-या टोकाला भगुरला तात्यारावांच्या अंगणातली मातीच्या गंध छातीत भरुन घ्यायचा.आणि सज्ज व्हायचा धुमाकुळ घालायला. मग पहिली धार ‘दुस-या’ तात्यारावांच्या घराबाहेरच्या ‘जगण्यासाठी माझी कविता कधीच नव्हती...’ ह्या बोर्डावर.... तिथुन जो अलिप्तपणा पावसाळा अंगात भिनवायचा तो त्याला पुढचे चार महिने पुरायचा.मग सिबीएस-शालिमारची अचानक धावपळ व्हायची. सोमेश्वराच्या धबधब्याला नवीन फ़ेस यायचा.गंगापुर रोड वहात रहायचा.नाशिकरोडला चौकाचौकाचे आडोसे धरुन डोक्यावर रुमालाची बांधाबांध सुरु व्हायची. मग मेनरोड्ला डोकी कमी छत्र्यां जास्त. सरकारवाड्याच्या शेजारची कौल टपटप ताल धरायचे.जवळच आनंदीबाईची हवेली अंबाडा सोडुन परत सारखा करायची. सकाळी अंघोळ करुन सुद्धा बसल्या बसल्या जरा झोपेची लहर आल्यावर नव्या हिमतीने तोंडावर स्वच्छपाणी मारल्यागत.. नाशिक नवं नवं नटायचं. पण आताशा... भरुन आलेले ढग वरुनच बेशिस्त माजोरड्या रिक्षावाल्यासारखं "अय येता का ? " असं विचारणा-या नाशिककडे तोंड फ़िरवतं.मग पाऊस राग उतरल्यावर उगाच अंदाज घेण्यासाठी चारदोन थेंब टाकुन पाहतो तर तेही जमीनीवर कमी आणि बेढब काळ्याबिंद्र्या भाऊ-दादांच्या फ़्लेक्सवर जाऊन पडतात.गोदेमध्ये पहिली डुबकी मारावी तर सर्वांगाला शेवाळाची घाण , धुणेक-यांचे ‘मांगल्य’ आणि पुन्हा ‘स्वच्छताप्रिय’वाहनांचे ‘सर्वमांगल्य’.इतकं करुनसुद्धा जर "तुला जावंच लागेल" अशी त्रंबकराज शंकराने दटावणी दिली तर उगाच तो पाऊस शाळेला कावलेल्या मुलासारखा हो-नाही करत पाट्या टाकल्यागत शिंपण करतो. ती शिंपणसुद्धा काही वेळातच भुरभुर करत स्वत:च अंग आकसुन घेते...कारण चारदोन थेंब गाडीच्या लोगोवरुन घसरण्याऐवजी लोगो चोरलेल्या खरबुड्या जागेत अडकुन राहतात, काही थेंब चौकामधल्या बेशिस्त आक्रस्ताळी रिक्षावाल्यांच्या थुंकीत अडकुन भिंतींला तर काही थेंब रस्त्याच्या कोप-यात दडतात,उरलेले थेंब राजीवगांधी भवन बाहेरच्या ‘फ़ुलटाईम दुर्लक्षित’आंदोलन करणा-या मंडपावर अडतात. काही थेंब कॉलेजरोडच्या‘विली’ला दड्पुन रस्ताबदलुन पलीकडच्या गंगापुर रोडकडे जातात पण तिथेही सोनसाखळी चोराच्या तोंड लपलेल्या रुमालात थिजतात.उरलेले थेंब दत्तमंदिरच्या ट्राफिक पोलीस नसलेल्या सिग्नलवरुन ओघळतात तर काही थेंब बिटको चौकातल्या सिग्नल तोडुन , १०-१२ प्रवासी कोंबलेली रिक्षा पाहुनसुद्धा दुर्लक्ष करणा-या षंढ ट्राफ़िक पोलिसच्या बिल्ल्यावर पडतात. गल्लीबोळातल्या अतिक्रमणात अडकुन पडतात , अन काही थेंब दिशादर्शक कमानींवर गलेलठ्ठ थोबांडांचे अभिनंदन बॅनर असल्यामुळे रस्ता चुकतात आणि भलत्याच माळरानावर जाऊन बरसतात.त्याचा आपल्या नाशिकला फ़ायदा शुन्य. असा हा उशीरा उगवलेला पाऊस चार महिने सत्राशे साठ ठिकाणी अडकतो,हिरमुसतो आणि पुढल्यावेळी आणखी जास्त अंग चोरत पायातल्या चपलाही न काढता नुसता डोकवतो. मधल्यासुटीत शाळेच्या अंगणात डोळे किलकिले करत ‘आ’करुन उभं असलेल्या चार दोन पोरांच्या तोंडात गेल्याचे...चार आणे समाधान उराशी घेउन .पाऊस नाशकातुन काढता पाय घेतो आणि पुढे कुठल्याशा गर्दरानात जाउन पडत नाही तर जुन्या नाशिकच्या हिरव्या आठवणी आठवत धो धो रडत राहतो. - प्राजक्त देशमुख deshmukh.praj@gmail.com

Wednesday, February 1, 2012

सावली

सावल्यांनी मनावर घेतलं तर,
क्षितीजभर लांबोळक्या होतात
सावल्यांनी मनावर घेतलं तर,
पायाखाली ठिपक्याभर दिसतात
.
सावलीचं बरं आहे,
सालं,आभाळालाच थोरलेपण चिकटलंय !

Thursday, February 17, 2011

मंत्रालयास....

एकदाच घोषितच करुन टाका
कळ्यांनी आणि काकणांनी
फुलायचच नाही
फुलाल तर रातराणीगत रात्री
पण राहु द्या एवढी खात्री
सुगंध जागच्या जागी विरेल
काकणं वाजुन भोवतीच फ़िरेल
काकण आणि कळ्या
चोळामोळा चारचौघात...
त्याला उलटुन ना जाब ना फ़िर्याद
हे एकदाच घोषित तरी करुन टाका.

-प्राजक्त
०५।०२।११

Wednesday, October 6, 2010

स्वच्छ चौकोन

काल परवाच्या भांडणात
भिंतीवरचा फ़ोटॊ निखळुन
जमीनीवर खळाळला...

आता तिथे फ़ोटो नाही
उरलाय फ़क्त
स्वच्छ चौकोन...

जो आठवण करुन देतो...

आपल्या क्षुल्लक भांडणाची
.
.
.
.
आणि तु नसण्याची.

- प्राजक्त ।०६।१०।१०

Wednesday, August 4, 2010

झोप आता....

मी: झोप येत नाहिये आज
विदुषक: गोष्ट सांगु ?
मी: हम्म...!
विदुषक :
ती चालायची....

मी :एक...एक एक मिनीट...हि गोष्ट आहे कि कविता ?

विदुषक : गोष्ट असेल तर हजार आणि कवितेला लाख मोजणार आहेस का ?
मी : हम्म सांगा....

विदुषक :

ती चालायची...
आपल्या अंगठ्याकडे बघत
आजुबाजु वाहत्या वा-याकडे सुद्धा
डोळॆ वर करुन न बघत
चालायची ती...

वाहत्या वा-याकडे
दुर्लक्ष केले चालले असते
घुटमळत्या वा-यांना वेळीच
डोळॆ वटारुन घाबरवलं असतं वा
चकवलं असतं तर जास्त काळ
चालली असती अजुन
कित्येक वर्ष...

आता
घुटमळत्या वा-याने
तिला पिंजुन काढले आणि
ती उपडी जमीनीवरुन भरलं आभाळ
बघत शेवटले श्वास मोजत
विचार करतेय
की,

अंगठ्याकडुन
आभाळापर्यंतचा
कसला प्रवास जिवघेणा ठरला

मी : ....... !!!!!

विदुषक : झोप आता....
मी : ....!!!

-प्राजक्त

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...