Wednesday, July 31, 2013

उतना मिले तो झोपडोंमे दावतोंका हुक्म हो
प्लेटमें लेते हुए जितना गीरा था लॉनपर

- प्राजक्त

Wednesday, July 24, 2013

कोलाज २३

तुमने कहा रात ,
मैंने सुरज को फुंकसे बुझा दिया
तुमने कहा दिन तो,
चांद पे घासलेट छिडककर दिन भी उगा दिया

तुमने बारिश कहा तो
अासमां निचोडा 
अौर धुप कहा जब
बादल खदेडा

तुने अासमां कहा तो 
जमीं के अारपार सुराख खोंदा ,
कि  परला अासमां दिखा दिया

अौ' जमीं कही तो
अासमां के मत्थेपे मिट्टीका तिलक जमा दिया  


तु मौत कह दे ,
मै नब्जोंको अकड लुं
यारा , तु बस जिंदगी कह दे 
मै मौत का गिरेबां पकड लुं

- प्राजक्त १९ जुलै १३

Tuesday, July 23, 2013


तेरी याद नब्ज होती तो ठिक होता

ये रात बनी बैठी है, कटती नही

Monday, July 22, 2013

पेचों-खम

जिंदगीभर कोइ गम तो ढो ता नही 
जख्म धो भी लेगा की दर्द धोता नही

खुदको कोस कर कहा मैने अपने अापसे
इसकदर कोइ अपनी जान खोता नही

हंस के उसने ब्याह का जिक्र सामने किया
हथेलीपे रखा कफन कोइ न्योता नही

तसल्लीके लिए ही बस कारीगर टिक गया
हरकोइ तख्तपर सुल्तान होता नही

अमन की चाह है तो,यार इश्क का सबक तु रट
खुदा के नाम पर कोइ खौफ बोता नही

ठोकरोंसे तर-ब-तर है हमारे पेचों-खम
हम तो सो जाएंगे ख्वाब सोता नही

उपज उपज के ये जमीं बंजरसी हो गइ
अाजकल याद में मैं भी रोता नहीं

- प्राजक्त ।२०।७।२०१३

Friday, July 19, 2013

कधी

कधी उंचशा आभाळातुन, रिमझिमणारा श्रावण होते
कधी तारका वीजेत गुंफून, लुकलुकणारे पैंजण होते 

खडा शांतशा तळ्यात अन तु, गोल गोल राणी होते

कधी उकळती कढई चुकले ,तडतडणारे पाणी होते 

कधी एकांती पोकळवेळी,अस्पष्ट हळुचशी कुजबुज होते

कधी गर्दीच्या झुंबडवेळी,स्पष्ट ठळकशी अलगूज होते

लाळ टपकत्या सभेत तन्मय, लज्जारक्षण धावा होते

कधी सावळ्या ओठांखाली, सांजभुलीचा पावा होते 

कधी कलंडती रंगबादली,विस्कटलेले आभाळ होते

कधी कुडकुडत्या थंडीमध्ये,वाफ बोलकी सकाळ होते

कधी थांबल्या ओळीवरती, टोक मुडपले पान होते

कधी छातीला खोपा पुस्तक,घसरुन दचकते भान होते 

कधी वेडसर डोळ्यांमधली,स्थिरबाहुली तंद्री होते

भिवईमध्ये नटुन बसता,चित्त पछाडुन ‘चंद्री’ होते


तु नसल्याची जाणीव..


- प्राजक्त

Wednesday, June 26, 2013

माझी काय चूक ?

" दर्यामध्ये हळूहळु संध्याकाळ जेव्हा विसावते
तेव्हा 'तू' केशरी-किरमीजी रंगी शाल होउन
पसरतेस माझ्यावर "

असं मी म्हणु शकलो असतो
पण
मला तिथे दिसतो ,
घरी परतणारा मजुर
(ज्याचे वीस रुपये कापलेत मुकादमा ने
सकाळी तुळशीजवळ रेंगाळला म्हणुन)
अन दिसतं
त्याच्या पायजमा टरकवल्या पट्टीच
ठेच लागलेलं लाल रक्त,
निळ्या मुक्यामाराखाली
अशी दिसते संध्याकाळ 


त्यात माझी काय चूक ?
"नभातुन पाउस उगु लागला की
प्रत्येक थेंब, एक अलिंगन होत-प्रत्येक अलिंगन ,
बहात्तर वादळं निर्माण करतात अंगाअंगात "

असंही मी म्हणालो असतो
पण
ठेवली असतील
कुठल्यातरी खोपट्याच्या छप्राखाली
अाता बहात्तर भांडी ,
प्रत्येक थेंब झेलायला
अाणि
अाज भूक कशात रांधायची?
ही वादळं निर्माण झाली असतील पोटात
असा दिसतो मला झोकातला पाउस

ह्यात माझी चूक काय ?
राम म्हटलं कि
दिसते शरयूला अालेली अवेळी भरती
अन अाभाळात नसलेल्या चंद्राच्या वेदना
कृष्ण म्हटलं कि दिसतो
रानावनात, हरवलेलं मोरपीस शोधणारा सैरभैर मोर
(तशी राधा म्हटलं की अाठवते राधाच
अन अातड्यात नवा पीळ येतो म्हणा)

पण ह्यात तरी माझी काय चूक ?
" धगी पल्याडचा निर्वात,
लाव्ह्यामधली धग,
जमीनखालचा लाव्हा ,
पायाखालची जमीन,
भस्सssक्कन नाहीशी होते जेव्हा
तुझ्या भिवइतुन डोकावते चंद्रकोर "

असंही मी म्हणेन पण
पण भिवइपासुन अगदी हाकेच्या अंतरा-वर
असलेलं तुझं सौभाग्य
गुरूत्वाचे नियम लागु करुन...
पुन्हा देतात मला जमीनीचा शाप

ह्यात माझी चूक ?

" क्षितीजाचा सप्तरंगी चाप
तस्साच्या तस्सा तोडुन ,
गळयाभोती मढवेन
अन हुक म्हणुन
शुक्राची कडी "

असंही रंगवलं असतं
पण
ज्याने त्याने गिरवलेला
रंगात बरबटलेला
देव दिसतो त्यात मला

ह्यात काय अाहे चूक माझी ?
टिचकीत उडवलेलं नाणं
जेव्हा मनाप्रमाणं छाप्याचं दान देत
तेव्हा सगळं सगळं विसरुन
उन्माद करण्याऎवजी
मी धुळमाखलेल्या काट्याचे कपडे
झटकत त्याला उठवु पाहतो

कदाचित ह्यात माझी चूक असेल !

पण अशाच पेचात असतांना
एकदा माझा गुंता गुंडाळुन
मी तुझ्याच गाठींची उकल मांडुन बसलो
तेव्हापासुन
प्रत्येकवेळी पलीकडे 'तू' भेटशील
असं वाटायला लागलंय अाताशा

मला सांग
हया अशा वाटण्यात तरी
माझी काय चूक ? - प्राजक्त । २५।६।१३ 

Tuesday, June 25, 2013

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...