Sunday, November 1, 2015

बॅकबेंचर्स : १५ तुकाराम (सामना ३१ अॉक्टोबर १५)




लहानपणी जेवणाची वेळ टळुन, चहाची वेळ यायची तरी मी हाका मारुन थकलेल्या आईला ५ मिनीटांत आलो हे उत्तर दर २-२ तासाने देत असायचो. मग वैतागून पदर खोचुन आई बांगड्यां मागे खेचुन मला हाताला धरुन न्यायची. आणि रविवारी मोटारसायकल धुवावी तशी माझे हातपाय धुवून जेवायला बसवायची. तणतणत म्हणायची 'इतका कसला खेळ . जेवणाचंही भान नाही म्हणजे काय. तुक्याची खोडं मेली' जित्याची खोड ऐकुन होतो पण तुक्याची खोड म्हणजे सगळं भान विसरुन काहीतरी करत राहणं हा शब्द प्रयोग मराठीला दिला तो माझ्या घराने. मग हळुहळु त्या तुक्याशी एकएक गुणधर्म जुळू लागला. मनासारखा छापा पडला कि मित्र नाचायचे पण मी मात्र शिक्का उचलून आधी 'काट्याचे' कपडेधुळ स्वच्छ करायचो. न देखवे डोळा ऐसा हा आकांत। पर पिडे चित्त दु:खी होते। तुकोब्बा.
मग काळाने घात केला आणि मी लहानाचा मोठा झालो. आणि ' मी बोलत असतांना कुठे तंद्री असते हो तुमची' असं विचारणारी तुकोब्बारायांची अवली इथेही आयुष्यात आली. कोणी कसंही वागो हसतमुखाने शांतचित्ताने सगळं निभावून नेण्याचा तुकाचार(तुकारामी शिष्टाचार ) अंगी भिनला असल्याने कुणी चिडून वीट जरी फेकली तरी तिला 'सावळ्याची भेट' म्हणुन मी पुजेल की काय ह्या भितीने कुणी कधी ते ही केले नाही.हे लहान आणि मोठे होण्याच्या प्रवासामध्ये एक तारुण्य नावाचा थांबा येतो. त्यात कुणी 'मार्गाला लागतं' तर कुणाकुणाला खरा मार्ग सापडतो. आजोबाम्हणायचे 'बिडी काडी, दारूबाजी परवडली पण नाटकाची दळभद्री थेरं नको' पण कसंय नव्या बाकावर लिहलेलं असतं ना कि ' रंग ओला आहे बसु नये' तिथे आपण गुमान वाट धरण्यापेक्षा अगोचर खात्री करुन हात रंगवुनघेतोच. तसं झालं आणि नाटकाने मानगुट धरलीच. तेव्हा चिडलेले आजोबा तुकोबाच्या दाखल्ला देत चिडले .उध्दरीले कुळ आपण तरला । तोचि एक झाला त्रेलोक्यात ।
पण नंतर प्रतिभा पाहुन शब्बसकी देत हेही म्हणाल्याचं आठवतं की शरण गेलियाने काय होते फळ । तुका म्हणे कुळ उध्दरीले .

तर असं आहे आपला आणि तुक्याचा संबंध. तुमचे जे चाल्लेय ते चालु द्या पण मला त्यात ओढुनताणुन आणु नका . तुम्ही समाधानी रहा मलाही राहु द्या. हे फक्त २ प्रकारच्या लोकं म्हणु शकतात. एक बॅकबेंचर किंवा दुसरे तुकोब्बाराया.
ठेविले अनंते तैसेची रहावे। चित्ती असु द्यावे समाधान।
म्हणुन तुकोब्बा जवळचे वाटतात.
पांडुरंग ! पांडुरंग !

-प्राजक्त
(दै सामना साठी )



ग ( मटा ३१ अॉगस्ट १५)


( निसटलेल्या खुणा)

ग तू मला नेमकी कुठे भेटलीस? ह्याचा मी जेव्हा जेव्हा शोध घ्यायला जातो तेव्हा तेव्हा मला सगऴयात अाधी अाठवतात त्या तू निसटल्याच्या खुणा. पाहिजे त्या क्षणाला खुप शोधाशोध करुन न सापडणारी पण एखाद्या अवचित वेळी नकळत जुन्याशा पुस्तकपानातुन जाळीदार सच्छील पिंपळपानासारखी गरगरत खाली येणारी तू नेमकी कधी भेटलीस ?, कुठे भेटलीस ? का भेटलीस ? ह्याचा मी जेव्हा जेव्हा शोध घ्यायला जातो तेव्हा तेव्हा मला सगऴयात अाधी अाठवतात त्या तू निसटल्याच्या खुणा.

अगदी लहानपणी , टॅह्यॅपणात रडतांना दोन श्वासांमध्ये उर धपापायचा अाणि झोळी वर टांगलेल्या फिरकी सोबत डोळे गरगरायचे , त्यानंतरच्या तासंतासाच्या अोल्या हुंदक्यांनी मान टाकल्यानंतरच्या अचानकशा पहिल्या घोटात सापडलीस कि त्या घोटातुन अालेल्या दचकण्यात सापडलीस कि त्यानंतरच्या झोपेत सापडलीस? शोध अजुन चालु अाहे. 
नंतर कधीतरी पुन्हा सापडलीस तेव्हा मी नाकळत्या कुशीतल्या वयात होतो. सायकलच्या प्रवासात डबलसीट बसलेलल्या अाईच्या कुशीत असतांना तिच्या कानाच्या डुलणा-या डूलेमध्ये , डूलेमधल्या चिमुकल्या घुंगराच्या लगबगीत तू पुन्हा सापडलीस. पण परतीप्रवासाला रित्या कानावर असलेल्या लालनिळ्या वळांमधुन , डूल नसलेल्या कानाच्या रंध्रामधुन निसटलीस ते निसटलीसच.
पुन्हा भेटलीस तेव्हा मी गावी माळरानावर हुंदडत होतो. तिथल्या रानाशेणातल्या वासात भटकत होतो. रानफुलं गोळा करत होतो.त्या फुलांच्या किरमीजी रंगात तू भेटत गेलीस. अचानक रानभैरी अाभाळ झाकोळुन अालं अाणि गचांडी धरुन झोडपावा तसा पाऊस अाला. सैरावैरा धावतांना एका धनगर बाबानं घोंगडीखाली घेतलं अाणि टेकाडावरच्या तुटक्या देवदगडाच्या गाभा-यात अाडोशाला बसवलं. तिथे कुंद गाभा-यातल्या उदबत्तीच्या अंधारवासामध्ये धनगराच्या दाढीघोंगडीचा मेंढीवास मिसळला. धनगरबाबा म्हणाला ‘पाहु हातात काये ?” मी मुठ उघडली तर अाधीचा रानफुलांचा कुस्कर होता. धनगरबाबा म्हणाला “ या फुलांस्नी काय म्हंता मायती का ? “ मी थरथरत्या अोल्या देहाने नाही म्हणालो. धनगरबाबा म्हणाला “ सितेची अासवं “. कड्डाड् वीजेचा कल्लोळ झाला.मी गप्पदिशी डोळे मिटले. तू तेव्हा निसटलीस परत.

एकदा अशीच तुळसकट्ट्याजवळ भिंगाने कागदं जाळत बसण्याची दुपार. “तुळशीला किड लागलीय बरं.ती उपटुन घे. उद्या वाड्यावरुन अाणुन दुसरी लाऊ” नंतर उरली ती जेवणावळी उरकल्यानंतर टम्म भरलेल्या पोटाची सुस्तावलेली दुपार.अाम्ही पेंगाळलो पण बायकांचा रामरगाडा चालु होता. बांगड्यांच्या येरझा-याच्या नादामध्ये जात्याची घरघर सुरु झाली अाणि जात्याचा खालचा दगड जणू माझी छाती अाहे असं दडपण येऊ लागलं.तू तिथे सापडलीस. जरावेळाने पलीकडे काकणाच्या तालावर ताकाची फेसाळ घुसळण चालु झाली. घुसळणीमुळे नसलेल्या झोक्यावर मला पडल्या पडल्या कोणीतरी जोजवतंय असं भासत राहिलं.तू तिथे सापडलीस. संध्याकाळी गोठ्यात कंकण सळसळीत कुणीतरी धारा काढत होतं तिथं तू सापडलीस. चुलीच्या जाळाशी थापलेल्या भाकरीच्या पिठांची वादळं राखेसोबत गरगरायची तिथे तू सापडली. त्याच रात्री सवयीने दुसरा घास ठेवायला तुळशीजवळ अालो अाणि तिथल्या तुळस नसलेल्या खळग्यात तू पुन्हा निसटलीस.

नंतर थोडं मोठं झालो तेव्हा पावसात कागदाच्या बोटीत, वहीतुन अस्ताव्यस्त फाडलेल्या पानांच्या उरलेल्या चुरगळीत सापडलीस. सायकलीच्या निसटल्या चैनीत , तिस-या दिवशी नखात अडकलेल्या ग्रिसच्या काजळीत सापडलीस. पहिल्यांदा जमलेल्या शिट्टीत, रात्री येळंमाळं शिट्टी वाजवतो म्हणुन अाजीने मारलेल्या टपलीत सापडलीस.एकदा रानात सापडलेल्या किड्याच्या शेपटाला दोरी लाऊन हॅलीकॉप्टर म्हणुन उडवण़्यात दोरी सकट तो किडा सकाळी कोळी जाळ्यात सापडला तिथं तू परत हरवलीस.

मधल्या काळात चहाकपाच्या गोल शिक्कयात , दोन बोटांमधल्या धुरातुनही भेटत राहिलीस तू. नंतर  कुणाकडुन काहीतरी हिसकवल्या गेल्यानंतरच्या विद्रोहातही तू भेटलीस. नाकारल्या, टाळल्या गेलेल्या दु:खातही मी म्हणत राहिलो कि “ त्यांना तर कुठेतरी रमायचं होतं पण अाता त्यांचा प्रवासपक्षी तुमच्याकडे जपा किंवा उडवुन द्या.एक दिवस माझीही हिच गत होईल त्या अाधी …. घ्या हा माझा उर अाणि मलाही माझ्या हक्काचा सूरा एकदाचा देऊन टाका." तेव्हा तू निश्चयाने भेटलीस.त्यावेळी तू निसटल्याची नोंद नाही माझ्याकडे.पण धुरकटल्याची अाहे.

मग काळाने घात केला अाणि अापण मोठे झालो. कुणीतरी डोळ्यात पाहिलं अाणि काळजात भरती अोहोटी झाली. मग त्याच कोणीतरी कायमचा निरोप घेतला तेव्हा अावेगाने भिडली अाणि तू सापडली परत. मग सावरीच्या झाडाची पांढरी म्हातारी जशी हळुहळु उडुन जाते तशी तू अलगद नकळत निसटत राहिलीस.
मोराचा जन्म लांडोराने प्राशान केलेल्या मोराच्या अश्रुने होतो तसं कारुण्यात गवसणा-या चैतन्यासारखी तू भेटली असावी असंही राहुन राहुन वाटतं. पण मोर म्हटलं कि लोकांना मोरपिस अाठवतो अाणि मोरपिस म्हटलं कि कृष्ण. पण मला मात्र कृष्ण म्हटलं कि रानावनात हरवलेलं,निसटलेलं एक मोरपीस शोधणारा मोरच अाठवतो. हि अजुन एक निसटल्याची खुण.

पण ह्या गवसण्या निसटण़्याच्या लपंडावात……. ग ‘कविते’ तू मला नेमकी कुठे भेटलीस?' ह्याचा मी जेव्हा जेव्हा शोध घ्यायला जातो तेव्हा तेव्हा मला सगऴयात अाधी अाठवतात त्या तू निसटल्याच्या खुणा.

- प्राजक्त २९/ १०/१५

म.टा. मैफल







Monday, October 26, 2015

बॅकबेंचर्स : १४ मेणबत्ती ( सामना २४ अॉक्टोबर १५)

झालं असं कि मुख्याध्यापकच्या कॅबीनबाहेर मोठा गदारोळ चालु झाला.पालकांची गर्दी झाली. शिक्षकदिना नंतरचा दुसराच दिवस." शाळेत असं काहीही शिकवतात का ?" वगैरे असे प्रश्न विचारत पालक लोकं हात नाचवत भांडत होते. कसं बसं सगऴयांना अात बसवलं अाणि शांत केलं. मुख्याध्यापक सरांनी विचारलं "नक्की अडचण काय अाहे ? " मग एक एक जण बोलु लागला. मग सरांना लक्षात अालं कि हि सर्व मंडळी एकाच वर्गातल्या विद्यार्थ्याीची अाहे. मग सरांनी सगळ्या पालकांना कॉन्फरंस रुमला वाट पहायला लावली. सर स्वत: ज्या वर्गाचा हा गोंधळ होता तिथे गेले तुकडी 'फ' . तिथे जाऊन चालु तास थांबवुन मास्तरांना बाहेर थांबायला सांगितलं. वर्ग बंद केला. अाणि खड्या अावाजात प्रश्न विचारला " काल शिक्षकदिनाला 'सामान्या ॹान' हा विषय कोण शिकवत होतं ? " शेवटच्या बेंचवरुन मी हळुच हात वर केला. "पुढे ये" ढग गडगडावे तसा सरांचा बेस मधला अावाज गडगडला. मी बुचकाळ्यात पडलो. पहिल्या बेंचवरचा ढापण्या जसा 'संत चेहरा' करुन बसलेला असतो तसे निरागस भाव मी डोळ्यापुढे अाणायचा प्रयत्न केला. मग मुख्याध्यापक म्हणाले " रामायणात राम-रावणा युद्धा मध्ये कोण जिंकलं ?" कोणी २+२ किती ? इतका सोपा प्रश्न विचाराल्यावर जितके निवांत होतात तितका निवांत झालो. अाणि नजरेत नजर रोखुन,शाबासकीच्या अपेक्षेने उत्तर दिलं " रावण" 
सरांच्या कानातुन धूर येत असावा असा मला भास झाला. पण कदाचीत ते कानावरचे थरथरणारे केस असावेत अशी मी उभ्या उभ्या स्वत:ची समजुत घातली. ( "कानावर केस असणारे मोठे विचारवंत अाणि हुशार असतात बरंका!" उगाच अाजोबांचे शब्द अाठवले)चोरट्या नजरेने वर्गातल्या कोप-यातल्या टिळकांच्या फोटोला मनातल्या मनात नमन केले. सर म्हणाले " तुझ्या अशा सांगण्यामुळे सगळे पालक भांडायला अाले अाहे, " त्यानंतर सर निमुट माझ्या जागेवर मागच्या बाकावर बसले अाणि म्हणाले सांग रावण विजेता कसा सांग ?" मी  सुरु झालो " प्रत्येक राजाची अशी अट असते कि शत्रु राजाने अापल्या राज्यात पराभुत झाल्या शिवाय किंवा मेल्या नंतरच पाय ठेवावा. अाणि वैकुंठनरेश विष्णुचा अवतार असलेल्या प्रभु रामाने लंकेत पाय ठेवला तेव्हा रावणाने प्राण सोडले होते. शिवभक्त रावणाला त्याच्या निष्ठेमुळे मरणोत्तर वैकुंठात जावे लागले.म्हणजेच प्रभु रामाच्या हयातीत रावणाने श्रीहरीरामाच्या राज्यात प्रवेश केला होतात.सबब रावणाने टेक्निकली युद्ध जिंकले." सर वैतागुन उपरोधाने म्हणाले "हे परम ॹानी मुला, हे असले ॹान चुक कि बरोबर च्या पलीकडे ठेवुन इतरांसोबर वाटायचे धाडस का केलेस? तुझे ॹान मेण अाहे ते असे पेटवुन वितळुन जाईल. जपुन ठेव."  
त्यावर मी उत्तरलो "दुसरी मेणबत्ती लावण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नाही. "
मुख्याध्यापक सर त्यानंतर अाठवडाभर रजेवर होते.

- प्राजक्त 
(दै. सामनासाठी )


Friday, October 16, 2015

बॅकबेंचर्स : १३ प्रश्नचिन्ह (सामना १७ अॉक्टोबर १५)

तो त्याचा उमेदीचा काळ होता. तो पहिल्या बाकावर बसायचा. इन्स्पेक्षन नावाचा भितीघालु प्रकारु त्यावेळी शाळेत होतसे. मराठीच्या सरांनी मोठ्या अभिमानाने त्याला उभं केलं अाणि म्हणाले " याला विचार प्रश्न." त्यांना त्याने जे उत्तर दिलं त्याचा मोबदला म्हणुन त्याची रवानगी शेवटच्या बाकावर झाली अाणि तो प्रथमपुरुषी एकवचनापासुन अंतिम पुरुषी अनेकवचनी झाला. म्हणजे 'हा हुशार मुलगा अाहे' पासुन 'ती सगळी मागची टुकार पोरं' असा बदल झाला.
नव्याने मुल्यशिक्षण नावाचा नविनच तास चालु झाला होता. सगऴयात पहिला वर्ग तो भरायचा. वर्गशिक्षक म्हणाले होते. "उद्या पासुन तुमचा मुल्यशिक्षणाचा पंधरा मिनीटाचा 'तास' घेणार अाहोत.(पंधरा मिनीटाचा तास ? त्याचं बालमन) यामध्ये तुम्हाला समाजोपयोगी अाणि व्यक्तिमत्व विकासासाठी लागणारे मुल्ये शिकवली जातील.अशा विनासायास शंभर पानी वहीतल्या मुल्यांच्या उता-यांचा किती उपयोग होईल याबद्दल माझ्या मनात चिडयुक्त शंका होती. अशातच एकदा मास्तरांना काय लहर अाली ते म्हणाले 'विचारा काही शंका विचारा, कोणताही प्रश्न जो तुम्हाला खुप दिवसापासुन छळतोय ,विचारा. गणीत,इतिहास,सामान्य ॹान काहीही असलं तरी विचारा.' तितकंच त्यांच्या 'जिॹासुपणा' ह्या मुल्याला चालना मिळो हा कदाचित मास्तरांचा अंदाज असावा. तसे नाना प्रश्न येऊ लागले. ' पृथ्वी गोलच कशावरुन ? , पाउस पडतो म्हणजे नेमके काय? , चिंचेला अांबे येतील का ?वगैरे कितीतरी कुतूहल शमवण्याचे काम मास्तर करत होते. अनेकवेळ लाव्ह्यासारखा दाबुन ठेवलेल्या त्याच्यातल्या ॹानपिपासु विद्यार्थ्याने उचल खाल्ली अाणि त्याने निश्चयाने हात उचलला अाणि प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
 " 'ज' जहाजेचा तर मग 'ण' बाणाचा अाणि 'ळ' बाळाचा कसा ? , प्रत्येक अाईसक्रिमवालाच्या गाड्याचे नाव सांवलिया का? , नवनाथ सोडुन रसवंतीगृहाला इतर नावे का नाही देत? ,जीव मारलेला अाहार मांसाहार मग वनस्पतींना सजीव नाही कशा ? पांढ-या झेब्राला काळे पट्टे असतात कि काळ्या झेब्र्याला पांढरे ? , शाळेच्या पहिल्या दिवशी , पहिलं वाक्य 'भारत माझा देश अाहे . सारे भारतीय बांधव..' मग शाळेत नाव घालतांना जातीचा दाख..... " त्याला मध्येच थांबवत त्या दिवसापासुन त्याची रवानगी झाली थेट मागल्या बाकावर झाली तेव्हा वर्गाच्या डोळ्यात हसुन हसुन पाणी होते अाणि मास्तरांच्या कपाळावर घामाचे.


- प्राजक्त


Friday, October 9, 2015

बॅकबेंचर्स : १२ सुप्रिया (सामना १० अॉक्टोबर १५)


एखादे इंजिन व्यवस्थित चालतं कारण त्या इंजिनमधले चक्र एकमेकांच्या खाच्यात घट्ट बसलेले असतात अाणि गोल फिरत राहतात. चक्र पण एकमेकांमध्ये त्याच्या गुणदोषांमुळेच घट्ट असतात. म्हणजे जिथे उंच अाहे तिथे दुस-या चक्राचे खोलगट भाग असतो अाणि याचा जिथे खोल तिथे दुस-याचा उंच. हेच गुणदोषांचे सुत्र जगतांना सगळीकडे लागु होते. उदाहरणार्थ मित्र किंवा त्याहुन चपखल उदाहरण म्हणजे तुमचा संसाराचा जोडीदार. थोरमोठी माणसं म्हणतात "असंच असतं सारख्याला वारखंच मिळतं. अावडी निवडी बरोबर विरुद्ध असतात." मग त्यावर सौ म्हणणार "बरोबरच अाहे इथे खड्डा असला कि कुठेतरी ढिग पाहिजेच ना". कसंय कि  कुंडली उत्तम जुळायला ३६ गुण लागतात. ह्या ३६ अाकड्यातच नियतीने डावपेच रचुन ठेवलेय. म्हणजे जुळली नाही तर गडबड हि होणारच अाणि उत्तम जुळली तरी पाठीला पाठ ३६.अाता बोला ! खिंडीत गाठणे म्हणतात ते हेच. पण हा विरोधभास गरजेचा असतो. तुम्ही चपलेचा अंगठा असेल तर अंगठा तुटल्यावर ज्या उर्वरित भागावर टिकुन सावरत पुढचा प्रवास होतो तो उर्वरित भाग म्हणजे तीच. तुम्ही अखंड अोढणारी जपमाळ असाल तर तुम्हाला परत भानावर अाणणारी ती मेरुमणी होते. तुम्ही भले अख्खी गाडी चालवा पण 'चावी कुठे ?' हे तिकडे विचारावंच लागतं. तुम्ही बाजारात गेल्यावर ज्या पैशात एखादी भाजी अाणतात तितक्याच पैशात तेवढ्याच भाजीसोबत कोथंबीरची जुडी अाणि चार लिंब त्यांनीच अाणावी. हे करणे पुरुषी येरागबाळ्याचे काम नोहे. पै पै मोजुन टम्म टम्म पाणीपुरी खाणा-्या लोकांना 'स्स्स् तिखट लागलं !! म्हणुन फ्रि मसाला पुरीच्या वरदानाची प्रथा एखाद्या कर्तव्यदक्ष तीच्या सुपीक डोक्याची कल्पना असु शकते. तुम्ही भले सुर्य असाल पण रखरखता, कपाळावर घाम अाणणारा. पण ती कपाळावरची चंद्रकोर होते. तुम्ही भले भव्य इतिहास असाल पण अाज जगतांना लागणार नागरिकशास्त्र तीच. तुम्ही स्वत:ला भूगोल समजा पण तो गोल ज्या अर्थकारणावर चालतो ते अर्थशास्त्र तीच. इथे मी 'तो' असल्याने उदाहरणादाखल 'ती'चे उदाहरण देतोय.'ती'असतो तर 'त्या'चे उदाहरण देता अाले असते कारण विषय जोडीदार असा अाहे. तुम्ही भले दुरुन दिसणारा प्रिय गुलमोहर असला तरी तो अतिप्रिय, सुप्रिय तेव्हाच होता जेव्हा तुम्ही अोंजळीत अोघळणारा प्राजक्त होतात.
म्हणुनच प्रत्येक बॅकबेंचरच्या अायुष्यात एक पुढच्या बाकावरचा स्कॉलर अावश्यक असतो.  संसाराच्या ह्या पत्त्याच्या डावात पुरुष कधी गुलाम होतो कधी राजा पण 'ती' नेहमी राणीच राहते
- प्राजक्त 



हाऊज दॅट

॥􏰀ी॥

हाऊज दॅट ?!?

आठव􏰁यातुन फ़􏰂 दोन 􏰃दवशी ‘लाल ड􏰄बा’ बसचं दश􏰅न होणारं गाव.ं माग􏰆या बाजुला वैतागुन ’जंगल’ 􏰇हणता येईल अशी झाडांची थोडीशी वद􏰅ळ. पल􏰈कडे टुमदार वाहणार􏰈 नद􏰈. ’टुमदार’हे 􏰉व􏰊च􏰋 􏰉वशेषण नद􏰈ला कसं...? तर 􏰌ातच 􏰍शवाईचं ड􏰎गर डोकावतं आ􏰏ण 􏰐यावर 􏰃दसणार टुमदार मं􏰃दरसु􏰑ा. 􏰍शवाई􏰆या ड􏰎गरा􏰆या पाय􏰒याशी समु􏰓काठ􏰔 वाळुचा खोपा के लासारखं असलेलं गाव. कौलाची,एका 􏰍श􏰕तीम􏰖ये उभी असलेल􏰈 बसक􏰗,लांबट घरं.मधुनच गेलेल􏰈 पायवाट सुबक वाट चौकात􏰘या गद􏰙ला आ􏰏ण 􏰉पंपळपाराला वळसा घालुन पुढे कपाले􏰚र मं􏰃दरासमोर􏰆या नंद􏰈बैलाला ’􏰆यक 􏰆यक...􏰌ॅक....’ करत पुढेच मोठं वावर ओलांडुन अगद􏰈 खाल􏰆या बाजुला 􏰊चंचे􏰆या ,वडा􏰆या रांगांपुढे उल􏰛या ’U’आकाराची कौला􏰜 बसक􏰗 इमारत 􏰝याला सगळे शाळा 􏰇हणत असे तर आमची ‘पतंगी गँग’ 􏰐याला ‘खाल􏰈’ 􏰇हणत अस.ु 􏰇हणजे बोल􏰞यात शाळा कमी आ􏰏ण...
“
काय रे खाल􏰈 गेला होता का?”
“
खाल􏰈 जाणार आहे का आज?”
“
आज उगाच खाल􏰈 आलो...असं वाटतयं !”
“
मा􏰕तर गावी गे􏰘येय.. ‘खाल􏰈’ जाऊन काय झ􏰟क मरणारे का रे आज?”
जी गो􏰠 तु􏰇हाला भ􏰉व􏰡यात ‘वर’ नेते 􏰢तला ’खाल􏰈’ 􏰇हणने जरा 􏰉व􏰊च􏰋 असलं तर􏰈... आपुलक􏰗ने आ􏰏ण रोज􏰆या वापरात असलेलं नावं अस􏰘याने श􏰄दश: ‘खाल􏰈’ असं 􏰐यात काह􏰈 नाह􏰈.
आमची पतंगी􏰣यांग 􏰇हणजे गावा मधलं चैत􏰤य (ह􏰈 आमची आ􏰇हालाच ओवाळणी).
पतंगी 􏰣यांग
“ ए गेल􏰈 रे गेल􏰈 “
“
लाईट 􏰟यामेरा आ􏰟शी.....!! कट कट क􏰛ल􏰈 रे कटल􏰈”
“
डावी घे डावी घे”
“
साडे माडे डु􏰄बुक रे भो ! “
शाळा सुटुन पुंज􏰟या पुंज􏰟याने आ􏰇ह􏰈 गोळा होतं वावरातले ढेकळं तुडवत घराचा र􏰕ता धरायचो.सवा􏰅त आधी शाळा सुटुन बाहेर ‘ठरले􏰘या 􏰃ठकाणी’ येणार तो –लो􏰛या आ􏰏ण मी (नव􏰘या).
लो􏰛या
“ मा􏰕तर... पोट दुखतंय ”
“
ए आला आला लोटा....”
“
हु􏰥पा हु􏰦या “
“
मा􏰕तर...पोट “
मी
"इं􏰃दरा गांधींना ‘पंत’􏰧धान ऐवजी ‘बया’􏰧धान असं का नाह􏰈 􏰇हणत?ं "
"
नोटांवर रा􏰨􏰉पता आहे तर 􏰢नदान 􏰊च􏰘लरवर रा􏰨प􏰩ी का नाह􏰈?"
"
ढग-रग सारखेच श􏰄द मग रगेमधे घु सु न िजतकं गु बगु बीत वाटतं 􏰢ततकं च ढगामधे जाउन वाटत असेल का ?"
“
ए भौ ...ब􏰕स ना खाल􏰈 !”

मी: काय रे कधी आला ?
लो􏰛या : (पोट दाबत) : ह􏰇􏰇􏰇म... एक तास झाला इथेच बसलोय..म􏰖ये म􏰖ये मागे वावरात फे रफटका टाकु न आलो.
मी: लो􏰛या तुला टोला देउ का रे...! खाल􏰈 येतोच कशाला ? एकदाच बुच बसवुन घे क􏰗 रे...
लो􏰛या : तर􏰈 बरं आज दोन वॅटरबॅगी आण􏰘या हो􏰐या...तु आणल􏰈य का ?
मी: ( सव􏰅 पाणी 􏰉पउन घेत) : संपलं !!!
लो􏰛या : संपवलं 􏰇हण.
मी: घाबरतो क􏰗 काय मग तुला तु􏰪यासमोरच 􏰢त􏰆या तळाला आकाश दाखवला ना रे...तुझा तळ बघ􏰞यापे􏰫ा बरं नाह􏰈 का त.े .
लो􏰛या : हे बघ नव􏰘या.....
(
􏰊चक􏰛या येतो)
􏰊चक􏰛या: मला पण दाखव...

􏰊चक􏰛या

“ ए पाहु पाहु “
“
बघु रे”
“
मी येतो मी येतो”
“
अरे जेवतोय का? आलोच हात धुउन ”

लो􏰛या: लांब उभा रहा ...
􏰊चक􏰛या : वास तु मार आ􏰏ण लांब आ􏰇हाला उभं करतो का रे..लोटे...टोले देउ का? मी : ग􏰥प रे....तो 􏰄ब... तो 􏰄ब...भव-या 􏰣यांगचा टव􏰟या चा􏰘लाय..

भव-या ग􏰬ग
“हवेत गोळीबार पतं􏰣यांचा..टोचु का टोक भव-यांचा ?” “तंगलेल􏰈 च􏰁डी,कान नाक तंग....उडाल􏰈 रे कटल􏰈 रे,कटल􏰈 पतंग “

लो􏰛या : (नाक दाबुन) ए ट􏰭􏰭􏰭􏰭व्व.....􏰟या !
मी आ􏰏ण 􏰊चक􏰛या : (आवाज घुम􏰘या सारखे करत) : 􏰟या 􏰟या 􏰟या 􏰟या......!!
टव􏰟या : (दु􏰜न) सांजेला भेटय...सांजेला भेट...कसा दांडकुळा उडवतो बघ.
लो􏰛या : चल रे माग􏰆या वेळी शु 􏰆या जागा ध􏰜न डा􏰭या हाताने जेवत होता घर􏰈 􏰉वसरला का...तसा आऊट करतो सांजेला.क􏰮ळं का ?
􏰊चक􏰛या : का का का का ....!!
लो􏰛या: 􏰇हणजे तसा नाय तर असा आउट....बरं का टव􏰟या...!
􏰊चक􏰛या: 􏰟या 􏰟या 􏰟या 􏰟या 􏰟य...
मी : ए ग􏰥पे 􏰊चक􏰛या ! लो􏰛या 􏰇याचे आज ?

􏰇याच :
“ गेला रे गेला..!”

“ये आयो उ􏰯ीघर आला“ 

“ 􏰊चख􏰘या आजी आल􏰈 बघ...” “आssssवाssssज देट हे ?“

च􏰛याप􏰛या : नव􏰘या तु 􏰧े􏰰 खुप 􏰉वचारतो रे...आज मेचे ना बाहाबाहा....
मी:मल कसं नाह􏰈 माह􏰈ती...
च􏰛याप􏰛या : "इं􏰃दरा गांधींना ‘पंत’􏰧धान ऐवजी ‘बया’􏰧धान असं का नाह􏰈 􏰇हणतं?" मा􏰃हतीय तुला ?
मी: नाह􏰈 ...नाह􏰈 सांग ना यार क􏰮ळं का तुला 􏰐याच कारण?
च􏰛याप􏰛या : ए नव􏰘या तु 􏰧े􏰰 खुप 􏰉वचारतो रे...आज मेचे ना बाहाबाहा....ग􏰥प ना ...हे 􏰧े􏰰 तुलाच पडतात...तुच शोध कारणं ....
􏰊चक􏰛या : आज मेचीचं माह􏰈त न􏰭हतं काय तुला ? ए...ए...फ़ु लवा चा􏰘ल􏰈 फ़ु लवा.....

फ़ु लवा

(फ़􏰂 हसतांना- चार वेग􏰮या ऍंगलन)े मी : इतकं गोड कु णी कसं हसु शकत बे ?

च􏰛याप􏰛या : ए तु 􏰧े􏰰 खुप 􏰉वचारतो रे ...नुसतं बघ ना बाहाबाहा.... 􏰊चक􏰛या : पण मी 􏰇हणतो मेचीचं माह􏰈त न􏰭हतं काय तुला ? सुतळी : 􏰟􏰟काssssय ??? तुला मॅचीचं माह􏰈ती नाह􏰈???

सु तळी

“ ए हे 􏰄ब...हे 􏰄ब...मी उडतोय “ “हवा म􏰱 उडता जाए”
“
मी जर 􏰊चडलो ना ...!” “.....”

सुतळी: अबे जर मॅचीच तुला माह􏰈त नाह􏰈,मग 􏰕टंप 􏰇हणुन तुला हु भा क􏰜 काय... च􏰛याप􏰛या: अरे हो 􏰕टंपं...

􏰊चक􏰛या: नव􏰘या 􏰕टंप ?

􏰕टंप

“पुजे􏰆या वेळी पाट कुठे जातो हो ?” “आssजी पाट नेऊ?” “गर􏰅..र􏰅..र􏰅..गर􏰅...र􏰅...र􏰅”
“
हाउज दॅsssssट?”

नव􏰘या: हो ना यार....आधी तर बोलायच.ं ..
􏰊चक􏰛या :आ􏰏ण आज फायनल मॅच आहे
सुतळी
: फायनल 􏰇हणजे अं􏰢तम नाह􏰈 फायनल 􏰇हणजे...एकदम फायनल...􏰉वषय संपवु भव-यांचा नव􏰘या: (पळत पळत) जातो मी बघतो पटकन....
(
􏰉पशवीतुन पाट􏰈 पडत.े ..नव􏰘या 􏰲यायला वळतो )
􏰊चक􏰛या : मी घेउन येतो , तु जा तु जा ..
च􏰛याप􏰛या: ए मोहांजदाडो सर चा􏰘लेत ओरडु नको

मोहांजदाडो सर

 “हड􏰥पाआ􏰏णमोहाजंदाडोसंकृती”

“हे 􏰇हणजे मोहांजदाडो संकृतीसारखंच” “मोहांजदाडोच कसं होत माह􏰈तीए का?” “खरंतर मोहांजदाडो􏰆या पानावर इ􏰢तहास 􏰍लहलाय”

सर : 􏰢नघा रे पो􏰛या हो ....

नव􏰘या : (पळत पळत .. घराकडे जाणा-या नेहमीची एक एक 􏰃ठकाणं मागे टाकतोय) खाट 􏰉वणतांना एकदा उभी􏰆या एवजी आडवी 􏰉वणल􏰈 तर कशी 􏰃दसेल?
वडाखालचा पार वतु􏰅ळा􏰆या ऐवजी चौकोनी कसा वाटेल?
मा􏰜तीराया, असं 􏰳कती पळुन उडी मारल􏰈 क􏰗..मग उडता येतं तु􏰪यासारख?ं

नद􏰈मधे सु य􏰅 चमकु न चमकु न...पाणी 􏰳कं चीत गरम होत असेल का ? म􏰱􏰴यांना ओळख􏰞यासाठ􏰔 रंग देतात तसा माणसांना 􏰃दला तर?
दोन र􏰕􏰐यांचा असला तर􏰈 चौकाला ‘चौ’क का 􏰇􏰵तात....
जोग􏰟का अंगणातच ... ? अंगणा􏰆या 􏰭या􏰶येपुरतं घर बांधलय का 􏰢तन?े घराबाहेर रांगोळी ? 􏰃दवाळी ला तर वेळ आहे....

(उडी मारत...तुट􏰟या तुळशीवर चढुन ...नव􏰘या कौलं चपापतो...) (􏰉पतळी फु ल.ं ...􏰉पतळी फु ल.ं ..􏰉पतळी फु ल.ं ....?)

(आतुन आवाज ):– नव􏰘या आला का ? 􏰧सादाचं सांगुन ये कसा ? (पाट नाह􏰈 ....􏰧सादाचं सांगावा ? – स􏰐यनारायण !!!!!!!)

पंतोबा गु􏰜जी – पाट आ􏰏ण चौरांगाम􏰖ये अंतर ठेवा...मधे पुजेचे ता􏰇हण ठेवायचे आहे
नव􏰘या
: (दरवा􏰝या􏰆या चौकट􏰈तुन गडबड बघत उभा....)
(
आजी ता􏰇हण ठेउन गेल􏰈....पंत चारवेळेस पळीने पा􏰋ाचे पाणी वरखाल􏰈 करत होते...आईचा नु􏰕ताच आवाज येत होता...आजोबा अंगावर अजुनह􏰈 पुजेला पांढरे व􏰷 􏰲यावे क􏰗 􏰉पवळॆ 􏰌ा 􏰉वचारात..) नव􏰘या : 􏰳कतीवेळ चालेल पुजा गु􏰜जी ?

आजी : तुला काय आटपाट नगरात जाऊन पाटपाट खेळायचा असेल ? हो ना ?...आज पाट 􏰍मळणार नाह􏰈.... जा...सगळी कडॆ 􏰧सादाला सांगुन ये !
नव􏰘या : पण आज खुप मह􏰐वाची मॅ􏰆चे ग !
आई : ऐकलं का ?जा पटकन !

आजोबा :इकडे ये ..! सग􏰮यांना पटकन बोलावुन घे 􏰧सादाला...􏰇हणजे पाट लौकर 􏰸रकामा होईल.

नव􏰘या : ( वेगवेग􏰮या 􏰃ठकाणी जाऊन 􏰉वचारतो. सगळी कडे ‘नाह􏰈’ अथा􏰅ची वेगवेगळी उ􏰹रं...) पाट आहे ? (नाह􏰈)मग 􏰧सादाला लौकर या !

पाट ? 􏰧साद....लौकर !
पाट असेल ना ? (नाह􏰈) 􏰧सादाला येउन जा लौकर !


पाट नसेलच ! (नाह􏰈) 􏰧साद पाठवुन देतो...येत नका बस.ु ..गुढघे दुखत असतील.

(दमुन नव􏰘या घर􏰈 )
आजोबा: काय नवलोबा....मोह􏰈म फ􏰹े ?
नव􏰘या: तु􏰇हाला घरात २ पाट ठेवायला काय होतं ?􏰌ा आठवडी बाजारात एक पाट आणा...कारण आजी : अsssssहो !
आजोबा: (डोळे 􏰍मचकावत)करायचे काय मी 􏰇हणतो २ पाट .... अरे वा रे वा !!
गु􏰜जी :दोघं जाउन अंगणात􏰘या तुळशीचा नम􏰕कार क􏰜न या !! तोवर मी 􏰉वरजण बनवतो.
आजी : पाणी आण नव􏰘या....सांडु
(नव􏰘याकडुन पाटा􏰆या शेजार􏰈 पडत)े
नव􏰘या
: गु􏰜, हे पाटावरचे आसन बदलुन घेतो ओले झाले थोडे
(माग􏰆या दारातुन 􏰊चक􏰛या आवाज देतो )
􏰊चक􏰛या:काय रे चल ना !
नव􏰘या : पुजा रे....
􏰊चक􏰛या : मग?
नव􏰘या : पाट रे .....
􏰊चक􏰛या : आयला मग ?
नव􏰘या : तेच रे....
􏰊चक􏰛या : मग ?
नव􏰘या : गप रे ....तु जा पुढ.े . सु􏰜 करा.. मी आलोच...
(
तुळशीकडुन परत येतात ...

नव􏰘या ( खेळतोय....) : टाक टाक आत म􏰖ये वळव ...􏰳फ़रक􏰗 नको....! पाटावर बसताच...काह􏰈तर􏰈 टोच􏰘यामुळे)

आई: अरे देवा....

आजी : (पाटावरचे आसन सरकवते...खाल􏰈 􏰉वटा 􏰃दसतात...आजी ओरडत.े ..) नवssssss􏰘या !!!!!!

(खेळाम􏰖ये – जोरात बॉल सुटतो...पाटा􏰆या आरपार जातो... बाद झा􏰘याने सगळे ओरडतात....आरपार झाले􏰘या भागातुन नव􏰘याचा चेहरा 􏰃दसतोय )
सगळे जण अजुनह􏰈 आनंदात ओरडताय : हाऊस दॅट !!!!???!!!!

-समा􏰺-

page5image12080

-􏰧ाज􏰂 देशमुख 

page1image16208

Friday, October 2, 2015

बॅकबेंचर्स : ११ कांदापोहे (३ अॉक्टोबर १५)

शेवटी मित्रमंडळीच्या शंका कुशंकांना वाव देत चाललेला लपंडावाला पुर्णविराम देत त्या दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतलाच. तसाही कित्येक वर्षांपासुन दोघांच्या कुटूंबांमध्ये घरोबा होताच. त्यामुळे भेटीगाठी ह्या अगदीच नावाला उरल्या होत्या. अाता एक अौपचारिक बैठक ठरली. इतिहासाने नोंद ठेवावी अशी वरपक्ष अाणि वधुपक्षाची न भुतो न भविष्यती अशी कांदेपोह्यांची बैठक.
तसे दोघांच्या कुटूंबांत जातपात हा विषय नगण्य होता. पण योगायोगाने दोघं समकुलिन असल्याने प्रेमविवाहात कळीचा ठरणारा तो ही मुद्दा चर्चापटलावर अाला नाही. " गर्मी काय वाढलीय ना ? " पासुन तर "धीस ब्लडी सिस्टिम इज करप्ट" पर्यंत सर्व गप्पा झाल्या. वरपिता मिश्किलपणे म्हणाले "आपण वर्तुळाच्या त्रिज्येवरच फिरतोय.मुद्द्याच्या मध्यबिंदुबद्दल कोणी बोलतच नाही?" इच्छुक वरवधु सोडुन सगळे गदगद हसले. इच्छुक वरवधु सोपस्कर म्हणुन फिसकले. " अाता मुलांनीच ठरवल्यावर अापण काय करणार" वधुमाता वदल्या. मग वरमाता म्हणाल्या "पण बाई , सांगुन,सवरुन ,विचारलं तरी. नाही का ?" एव्हाना वरवधुच्या डोळ्यांतुन गप्पा चालु होत्या. त्या गप्पा पाहुन वधुची लहान बहिण दात विचकत होती अाणि व़धु तिच्याकडे मोठे डोळे करुन 'गप्प बस्स जरा' असे मुकसंदेश देत होती. 
वरपिता म्हणाले " पण अामचे महाशय महाअाळशी अाहे. जुलैच्या पहिल्या बुधवारी केस कापायला मागे लागलं तर तो अॉगस्टच्या शेवटच्या रविवारी जातो." वधुमाता म्हणाल्या " अामच्या देवीला तर केस वाढव,केस वाढव म्हणुन थकलो. दुस-या महिन्यात कात्री लावुन येते पार्लरला जाऊन."  वरपिता  "अहो कॉलेज मध्ये ब्लॅकलिस्टेड होता तो. वडिलांना घेऊन या असं पत्र अालं होतं" वधुने गुंजारव केले  " हो पण पुढच्या वर्षी 'सर्वोत्तम विद्यार्थी' म्हणुन पण निवडल होतं त्याला."  " अं... त्या कार्यक्रमाला वडिलांनाच घेऊन गेलो होतो" वरदेवास ही पहिल्यांदा कंठ फुटला. सगळे परत मनसोक्त हसले. मग जरावेळ कार्यालय,तारिख,वार,पाहुण्यांची संख्या वगैरे अशी भरकटलेली चर्चा  वधुमाताने पुढचं वाक्य टाकुन रुळावर अाणली." हि शाळेत असतांना मला ही बोलवलं होतं. एका मुलीच नाकंच तोडलं होतं तीने. तेव्हापासुन कराटे बंदच केलं बाई अाम्ही तीच" पण वधुने परतवला तसा हा वार परतवायला वराकडे काहीच नव्हतं म्हणुन त्याने फक्त ग्लासभर पाणी रिचवले. "अहो हिला तर पोह्यांचा डबा कुठे ठेवलाय ते सांगता येतं का पहा" असं वधुमाताने सांगतांनाच वधु बहिनीने "घ्या ना समोसे गार होतील" असा अाग्रह केला. वरपिता म्हणाले "अहो अामच्या भगवंताला बाजारातले कांद्याचे भाव तरी ठाऊक असतील का शंका अाहे" अशा प्रकारे तिला 'पोह्यांचा न सापडणारा डब्बा' अाणि 'त्याला कांद्यांचे माहित नसलेले भाव' ही चर्चा "शेवटी बॅकबॅंचर होती वाया कशी जाईल ,पठ्ठी " , " अरे वा ! हा सुद्धा बॅकबेंचर की" इथे येऊन संपली. अाणि वरवधुंनी "लग्न होतंय ना? हां मग बास ! "हा मंत्र पुटपुट होईल ती मानहानी सहन केली.अाणि एकदाचे कांद्यात पोहे न्हाले.

- प्राजक्त



अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...