Friday, April 24, 2015
ब्रॅंड व्हॅल्यू ( मटा २५ एप्रिल १५)
Friday, April 17, 2015
आत खळबळ शून्य (मटा १८ एप्रिल १५)
अाजकालच्या धक्काधकीच्या लाईफस्टाईलमध्ये ….. हो हो ! 'धक्का’धकी म्हणायचंय मला ‘प्रिंटींगमिस्टेक' किंवा माझं अशुद्धलेखन नाही ते . म्हणजे कसंय दर दुस-या दिवशी कसलीतरी ब्रेकिंग न्युज, कुठेतरी धक्कादायक बातमीचा 'अाखों देखा हाल’ अापल्या फोनवर चित्रासकट येतो. तर अाजकालच्या ह्या धक्काधकीच्या लाईफस्टाईलमध्ये अापली अभिव्यक्ती अाणि संवेदनांची तिव्रता कमी झालीय का? असा प्रश्न पडु लागलाय. शुद्ध मराठीत म्हणायचं झालं तर 'अापल्या इमोशन्स अाणि फिलींग्जची इंटेंसीटी कमी झालीय का ?’ म्हणजे काहीही घडो, कितीही तीव्र असो पण अात खळबळ शून्य.
श्वास अाणि उच्छवासाप्रमाणे नियमित अंतरावर मोबाईलचा मेसेज बॉक्स शुकशुक करुन बोलवत राहतो. एखादा किरकोळ विनोद असो किंवा एखादी ‘पुलं लेवल’ची कोटी असो, वाचणारा गंभीर मुद्रेने, शुन्य नजरेने रिप्लाय देतो LOL. LOL म्हणजे असं सांगायचं असतं कि मी इकडे खळखळुन हसलो. किंवा असाही रिप्लाय जातो ROFL. ROFL म्हणजे अरे तुझ्या विनोदामुळे मी इकडे जमिनीवर गडाबडा लोळुन हसतोय. परंतु प्रत्यक्ष परिस्थिती अशी कि चेह-याचे भाव शून्य, नजरेतला अानंद शून्य अाणि महत्वाचं म्हणजे अात खळबळ शून्य.
रस्त्यांने चालणारे दिसतील. चालतांना पावलांचे अावाज कमी अाता किपॅडचे अावाज जास्त येतात.सगळेच ‘अंगठेबहाद्दर'.कधी कुणाला अानंद किंवा काळीज पिळवटणारं दु:ख झालंच तर अाधी 'स्टेटस अपटेड’ होतो मग ग्रुप मेसेज मध्ये बातमी जाते. नंतर प्रत्यक्ष घरात बातमी सांगितली जाते. अशा प्रकारे मानसिक अाधार पण अाता व्हर्च्युअल झालाय.जेवण महत्वाचं कि टिव्ही ह्या संभ्रमात जेवत जेवत टिव्ही बघतांना किंवा टिव्ही बघत बघत जेवतांना ‘अाणखी दोन शेतक-यांची अात्महत्या’ ही बातमी चालु असतांना दुसरा घास कालवलाच कसा जाऊ शकतो हे माझ्यासाठी कोडंच अाहे. अशा वेळेस चॅनेल बदलाल पण डोक्यातला विचार खरकट्या हातासारखे धुवू नाही शकत. नंतर हात धुतांना बेसिनच्या नळाचीही खळबळ होते पण अापल्या अात खळबळ शून्य.
लहानपणी गिरकी गिरकी खेळायचो. वर आभाळाकडे बघत, मागे मान टाकुन गर गर गिरकी घ्यायची. मग थांबलो कि समोरचे सगळे जग एकमेकांत मिसळून जायचे. पांढ-यांत लाल, लालमध्ये पिवळा, बिल्डिंगमधे रस्ता, रस्तामधुन ढग, ढगामधुन पिंपळाच्या पारंब्या सगळं जग उलट पालट होऊन जायचं. अंगणात चाफ्याचं झाडं होतं. गरगरत जात आधार म्हणुन त्याला धरलं कि परत हळूहळू सगळं जागेवर यायचं. अाता अाधाराला अंगण नाही, अंगणामध्ये चाफा नाही. चाफा अाणि मोबाईल दोन्ही सायलेंट मोडवर. अाणि सायलेंट मोड असल्याने अात खळबळ शून्य
कुणी म्हणेल तंत्रशिक्षण पुढारलं अाहे वगैरे वगैरे. हो पुढालंय ना. सगळं जग पुढे जातंय वगैरे वगैरे.हो जातंय ना. मग जर तेच अापण अंगिकारलं तर चुकलं कुठे वगैरे वगैरे?नाहीच चुकलं पण गुलॹार म्हणतात तसं पानं उलटवतांना जीभेवर जी पुस्तकपानांची चव रेंगाळते ती मजा ह्या क्लिकमध्ये कुठे हो? तंत्र नको सोडुया पण छोट्या गोष्टींमधली मजा तशीच अनुभवुन पाहु. इतकंच कि मित्राकडे गेल्यावर नेहमीसारखं घराखालुन मिस् कॉल देण्याऎवजी त्याला पुर्वीसारखा एकदा तार स्वरात अावाज देऊन पाहु. टिव्हीवरच्या कॉमेडी नाईटसोबत कधीतरी तळहातावर भवरा फिरवल्यावरची हुळहुळसुद्धा अनुभवुन पाहु. एसी जिममध्ये ट्रेडमीलवर घाम घाळतोच पण एखाद्या सकाळी जिमखान्याच्या रस्त्यावरचा गुलमोहर तुडवुन पाहु. चालतांना शेवटचा घाम कधी अाला होता ? पळतांना पायात शेवटचा गोळा कधी अाला होता? हसतांना पोटात शेवटचा मुरडा कधी अाला होता ? मिश्किलपणे मित्राच्या डोळ्यात संत्र्याचे साल शेवटचं कधी पिळलं होतं ? पिंपळाची सळसळ शेवटची कधी ऎकली होती ? ह्या प्रश्नांचा मागेमागे गेलं कि सापडेल खरं उत्तर. कोणत्या प्रश्नाचं उत्तर ? हाच प्रश्न कि 'अात शेवटची खळबळ कधी झाली होती ?'
- प्राजक्त ( मटा १८ एप्रिल १५)
http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31833&articlexml=18042015004023
Friday, April 10, 2015
ट्राफीकनामा ( मटा ११ मार्च १५)
Friday, April 3, 2015
वेगवेगळी उन्हं ( मटा ४ एप्रिल१५)
Friday, March 27, 2015
सेल्फी (मटा २८ मार्च २०१५)
Monday, March 9, 2015
वि वा शिरवाडकर
अरे ब्बाप ! मी नसतं ऎकुन घेतलं.
….मग बाप्पा म्हणाला कि जा, दिल्या शब्दाला जाग अाणि मन सांगेल तसंच वाग.सगळ्यांशी नीट वाग बरं? अाणि हो, दिसेल तेच खरं.
तुला जितकं दिसेल फक्त तितकं नाही जग , काही अडचण अाली कि माझ्याकडे ‘वर' बघ ! जा !
मग मग मी खाली अवतरलो. पांढरा कोट म्हणाला “अावाज नाही” कुजबूज झाली “ अावाज नाही - अावाज नाही”. दोन-चार फटके देत सगळे म्हणाले कि रड. मी म्हणालो "कशाला बरंय कि मन म्हणतंय जरा शांत रहावं." तरी अाग्रह झाला “रडावंच लागेल”.त्याने जोरदार फटका दिला. मी कळवळलो अाणि 'वर' पाहिलं. बाप्पा म्हणाला "अरे ब्बाप ! मी नसतं ऎकुन घेतलं” मी नेम धरुन त्याच्या तोंडावर धार मारली अाणि ट्यॅह्यॅ फोडला. त्याचा पांढरा कोट पिवळा झाला. गर्दी म्हणाली “अोहोहो ! अावाज अाला अावाज अाला.” मी म्हणालो पण मला शांत रहायचं होतं. ते म्हणाले “असं नसते रे”.
मग परत असं झालं कि ते म्हणाले “ पड , पड पालथा पड”. मी म्हणालो "बरंय कि अाभाळ दिसतं, चंद्र दिसतो, पतंग दिसते. झालंच तर पक्षी दिसतात. ते म्हणाले “असं नसतं रे”. मग कधी डावीकडुन, कधी उजवीकडुन मला ढुसण्या दिल्या. पडलो पालथा पडलो.
मग परत असं झालं कि ते म्हणाले “ रांग, रांग. असं पोटावर जास्त झोपलं कि पोट ढप्प होतं”. मी म्हटलं “असु द्या कि बरं वाटतं जमीनीशी जोडलेलं. मातीचा गंध ही छान अाहे. ते म्हणाले “असं नसतं रे”. मग रांगु लागलो तर ते म्हणाले “किती दिवस असं हि फरफट रे जीवाची ? प्राणी चारपायांनी चालतात तसा चाल.” मग मी तसा चालु लागलो. बरं चाल्लं होतं थोडे दिवस तर परत सगळे म्हणाले “ ऊठ कि किती दिवस असं प्राण्यासारखं? “ मी म्हणालो “रमलोय हो अाता. अाणि गर्भात कुणी तरी कानात कुजबुजलं होतं एकदा “ जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात." तर ते म्हणाले “असं नसतं रे”. मग मी अचानक चालु लागलो. सगळ्यांनी टाळ्या पिटल्या. तरी कुणीतरी म्हणालंच ह्याला ‘तरी ह्याला खरं पायावर उभं राहणं नाही म्हणत,बच्चू” .
मग खुळखुळा काढुन हातात पाटी अाली. मी म्हणालो “त तलवारीचा नको तराजूचा बरा वाटतो. जर अ अननसाचा असेल, ई ईडलिंबुचा असेल तर ळ कमळाचा ,ण बाणाचा कसा ?अाणि मला अात्ताच्या अात्त ईडलिंबू प्रत्यक्ष दाखवा.” ते म्हणाले “ बाssई !!!! किती पटापटा बोलता यायला लागलय छोन्याला ! “ मी बोल्लो “ते ठिक अाहे पण उत्तर ? “ ते म्हणाले “असंच अाहे अाणि असतं अाणि असणार. ळ कमळाचा अाणि ईडलिंबु तुझा तू शोध. अाणि मुख्य म्हणजे असं नसते रे”
मग पाटी गेली. रंग अाले . मी म्हणालो “हे बघा मला ‘ह्याला’ पिवळा म्हणु द्या अाणि 'त्याला’ जांभळा. ते म्हणाले "रंगांची गल्लत करु नकोस कधीही. एका एका रंगावर , एका एका धर्माचा दावा दाखल अाहे. कुठलातरी एक रंग असु द्यावा पाठीशी” मी म्हणालो “ रंगांच्या मक्तेदारीचा दस्ताऎवज दाखवा” ते म्हणाले “असं नसतं रे”
मग पाटी गेली. बुकं अाली. मी म्हणालो “ काल मी माझा पडलो. मी माझा परिने गुरुत्वशक्तीचा शोध लावला . ते म्हणालो “ नाही ! , तू फक्त न्युटन घोक.” मी म्हणालो “ अापल्या चुकांतुन शिकावं, दुस-यांचा चुकांमधुन का ?” ते म्हणाले “असं नसतं रे”.
मग बाप्पाच्या ‘मन सांगेल तसंच वाग’ ह्याला छेद देत ते जे जे म्हणाले ते ते मला मान्य करावं लागलं. करावंच लागलं. हा समज चांगला, हा चुकीचा. हे खेळ मुलांचे , तो खेळ मुलींचा. मांजर अाडवी -मागे जा. सायन्स छान-घोकत रहा !. कवितेने पोट चारोळी इतकं भरेल-सरकारी नोकरीत अायुष्य तरेल. प्रेमबिम विषय कट-जमिनजुमला लग्नाची अट, नोकरी लागताच लग्न कधी? माप अोलांडताच पाळणा कधी ?. संवाद बोलुनच घडला पाहिजे अाणि पाळण्यात पहिला पेढाच पाहिले. जात चालू घरघर- पीठ पडतं भरभर. सगळ सरत तरी काही तरी बाकी- केसांवर चढते पांढरी चकाकी.
मग मी म्हणतो “ बिना बोलण्याचाही होता हो संवाद, गेली अाडवी-उभी मांजर कशाला उगा वाद?” ते सगळे म्हणाला "असं नसतं रे”
मग इतक्या त्रासाने , वयाच्या थकव्याने , मर्जीने मी थांबवला श्वास तर ते म्हणाले नाही “जग जग घे श्वास. लावा वेंटीलेटर लावा” मी चिडलो अाणि ‘वर’ पाहिलं. बाप्पा म्हणाला “इतका त्रास ?अरे ब्बाप ! मी नसतं ऎकुन घेतलं.”इथली कळ बाप्पाला पोचली
मी रात्रीच वेंटीलेटरची वायर खेचली.
मी बाप्पाला म्हणालो “ बाप्पा, अाता? “
….मग बाप्पा म्हणाला कि जा, दिल्या शब्दाला जाग अाणि मन सांगेल तसंच वाग.सगळ्यांशी...…...
-प्राजक्त
२० फेब्रुवारी २०१५
मटा मैफल
अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)
मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...
-
1) Shripad Deshpande : काही-काही गोष्टी लहानपणापासून माझी तंद्री लावणाऱ्या. म्हणजे गरम गरम कातळावर तांब्याच्या पेल्यातून पाणी सोडलं त...
-
संगीत देवबाभळी... रंगभूमीचे अायाम बदलणारी एक विठूसावळी कलाकृती. मच्छिंद्र कांबळींच्या अाणि अाता प्रसाद कांबळींच्या भद्रकाली प्राॅडक्शनने म...
-
‘अंधाराला अंधाराला, दिशा नाही मेली ठेचकळ्या आभाळाला, मलमपट्टी केली।। हात रंगल्याले, शेणाच्या रंगात कपिलेचा गंध येतो माझ्याही अंगात।।...





