- प्राजक्त २९ /०८/२०१६
Monday, August 29, 2016
का असं ? लेख
- प्राजक्त २९ /०८/२०१६
Monday, July 4, 2016
‘तुम मेरे हो कौन कनु?’ : कनुप्रिया ( मटा १०/०७/१६)
ज्यावेळी धर्मवीर भारतींचं कनुप्रिया माझ्या हातात अालं तेव्हा तळाशी गेलेल्या ‘काहीतरी’ ह्या अनामिक भावनेने परत उचल खाऊन सगळं गूढगढूळ केलं होतं.
Monday, June 27, 2016
नाशकात अलिकडे पाऊस कमी का पडतो? म.टा.
तुम्ही अाम्ही अापली नुसती चर्चा करत राहतो“नाशिकच्या पावसाला नेमकं झालंय काय?” पुर्वीवर्गात भुगोलाच्या काटकुळ्या सरांनी प्रश्न विचारला"सांगा पाऊस कधी येतो ?"तर बॅकबेंचर पोरंसुद्धाएका सुरात म्हणायची "सा.....त...जुन !! " आता जर विचारलं तर फ़क्त खुसफ़ुस ऐकु येईल किंवा तीपोरं वर्गाच्या तुटक्या खिडकीतुन वर बघतील " भोआता पण येऊ शकतो काय भरवसा ? "
आधी कसं व्हायचं.... पावसाळा ब्रम्हगीरीला सोप्यामधे आपल्या चपलाकाढायचा..खुंटीवर आभाळाची टोपी अडकवुन, हातपाय पसरुन नाशकात बि-हाड टाकायचा. मामाच्या घरी आल्यासारखा.....पावसाआधी सगळंभरुन यायचं. पुलावरुन काळारामाच्या कळसाकडेपाहिलं की आभाळ कुठे सुरु होतं आणिकाळ्यारामाचा काळा कातळ कुठे सुरु व्हायचा हेकळायलासुद्धा वेळ लागायचा. गंगेतीरावरनारोशंकराची घंटा गार हवेने हलल्याचा भासव्हायचा. तिकडे त्रंबकराजाला थेंबांचा अभिषेककरुन हळुहळु पुढे अंजनीसुताची विचारपुस करतपलिकडे पांडवलेण्यांवरची लव्हबर्ड्सची खुडूबाजीपुसुन टाकायचा. तिकडे दूर जव्हारच्या घाटातलेकाजवेगोंदण पावसाच्या झोकात हळुहळु मिटुलागायचे.
तिकडे सप्तशृंगीच्या भुरकट पाय-यांना नवा काळारंगयायचा. सगळ्या देवांचे आयास सायास झाले कीमग आभाळ दुस-या टोकाला भगुरला तात्यारावांच्याअंगणातली मातीच्या गंध छातीत भरुनघ्यायचा.आणि सज्ज व्हायचा धुमाकुळ घालायला. मग पहिली धार ‘दुस-या’ तात्यारावांच्याघराबाहेरच्या ‘जगण्यासाठी माझी कविता कधीचनव्हती...’ ह्या बोर्डावर.... तिथुन जो अलिप्तपणापावसाळा अंगात भिनवायचा तो त्याला पुढचे चारमहिने पुरायचा. मग सिबीएस-शालिमारची अचानकधावपळ व्हायची. सोमेश्वराच्या धबधब्याला नवीनफ़ेस यायचा. गंगापुर रोड वहातरहायचा.नाशिकरोडला चौकाचौकाचे आडोसे धरुनडोक्यावर रुमालाची बांधाबांध सुरु व्हायची. मगमेनरोड्ला डोकी कमी छत्र्यां जास्त. सरकारवाड्याच्या शेजारची कौल टपटप तालधरायचे.जवळच आनंदीबाईची हवेली अंबाडा सोडुनपरत सारखा करायची. सकाळी अंघोळ करुन सुद्धाबसल्या बसल्या जरा झोपेची लहर आल्यावर नव्याहिमतीने तोंडावर स्वच्छपाणी मारल्यागत.. नाशिकनवं नवं नटायचं.
पण आताशा... भरुन आलेले ढग वरुनच बेशिस्तमाजोरड्या रिक्षावाल्यासारखं "अय येता का ? " असंविचारणा-या नाशिककडे तोंड फ़िरवतं. मग पाऊसराग उतरल्यावर उगाच अंदाज घेण्यासाठी चारदोनथेंब टाकुन पाहतो तर तेही जमीनीवर कमी आणिबेढब काळ्याबिंद्र्या भाऊ-दादांच्या फ़्लेक्सवर जाऊनजास्त पडतात. पावसाने गोदेमध्ये पहिली डुबकीमारावी तर सर्वांगाला शेवाळाची घाण , धुणेक-यांचे‘मांगल्य’ आणि पुन्हा ‘स्वच्छताप्रिय’वाहनांचे‘सर्वमांगल्य’. बरं इतकं करुनसुद्धा जर "तुला जावंचलागेल" अशी त्रंबकराज शंकराने दटावणी दिली तरउगाच तो पाऊस शाळेला कावलेल्या मुलासारखाहो-नाही करत पाट्या टाकल्यागत शिंपण करतो. तीशिंपणसुद्धा काही वेळातच भुरभुर करत स्वत:च अंगआकसुन घेते...कारण चारदोन थेंब गाडीवरच्यालोगोवरुन घसरण्याऐवजी लोगो चोरलेल्या खरबुड्याजागेत अडकुन राहते, काही थेंब चौकामधल्याबेशिस्त आक्रस्ताळी रिक्षावाल्यांच्या थुंकीत अडकुनभिंतींला तर काही थेंब रस्त्याच्या कोप-यात दडतात, उरलेले थेंब राजीवगांधी भवन अाणि नाशिकरोडच्याविभागीय अायुक्तालया बाहेरच्या ‘फ़ुलटाईमदुर्लक्षित आंदोलन’ करणा-या मंडपावर अडतात. काही थेंब कॉलेजरोडच्या‘विली’ला दड्पुनरस्ताबदलुन पलीकडच्या गंगापुर रोडकडे जातातअाणि काही इंदिरानगरला. पण तिथेही सोनसाखळीचोराच्या तोंड लपलेल्या रुमालात ते थिजतात. उरलेले थेंब दत्तमंदिरच्या ट्राफिक पोलीस नसलेल्यासिग्नलवरुन ओघळतात तर काही थेंब बिटकोचौकातल्या सिग्नल तोडुन , १०-१२ प्रवासीकोंबलेली रिक्षा पाहुनसुद्धा दुर्लक्ष करणा-या षंढट्राफ़िक पोलिसच्या बिल्ल्यावर पडतात. गल्लीबोळातल्या अतिक्रमणात अडकुन पडतात , अन काही थेंब दिशादर्शक कमानींवर गलेलठ्ठथोबांडांचे अभिनंदन बॅनर असल्यामुळे रस्ता चुकतातआणि भलत्याच माळरानावर जाऊन बरसतात. अाजकाल काही सरी तर झोकात बरसायची तयारीकरतात पण पंचवटी , सातपुर भागातल्यानिर्ढावलेल्या गोळीबारात घाबरुन पुन्हा वाफ होऊनढगात अंग चोरुन बसत असाव्यात.
पण ह्या अशा सगळ्या तुरळक,घाबरट, शिंपलेल्या पावसाच्या थेंबांचा आपल्या नाशिकला फ़ायदाशुन्य. असा हा उशीरा उगवलेला पाऊस चार महिनेसत्राशे साठ ठिकाणी अडकतो,हिरमुसतो आणिपुढल्यावेळी आणखी जास्त अंग चोरत पायातल्याचपलाही न काढता नुसता डोकवतो. मधल्यासुटीतशाळेच्या अंगणात डोळे किलकिले करत ‘आ’करुनउभं असलेल्या चार दोन पोरांच्या तोंडातगेल्याचे...चार आणे समाधान उराशी घेउन .पाऊसनाशकातुन काढता पाय घेतो आणि पुढे कुठल्याशागर्दरानात जाउन पडत नाही तर जुन्या नाशिकच्याहिरव्या आठवणी आठवत आठवत धो धो रडतराहतो. अाणि तुम्ही अाम्ही चर्चा करत राहतो“नाशिकच्या पावसाला नेमकं झालंय काय?”
Sunday, May 8, 2016
Tuesday, April 12, 2016
लेख : रघुवीराच्या देहत्यागाचा साईडइफेक्ट
Sunday, April 10, 2016
गप्पा टप्पा : मुलाखत : म.टा.
Saturday, March 26, 2016
रंगवारकरी : कविता
अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)
मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...
-
1) Shripad Deshpande : काही-काही गोष्टी लहानपणापासून माझी तंद्री लावणाऱ्या. म्हणजे गरम गरम कातळावर तांब्याच्या पेल्यातून पाणी सोडलं त...
-
संगीत देवबाभळी... रंगभूमीचे अायाम बदलणारी एक विठूसावळी कलाकृती. मच्छिंद्र कांबळींच्या अाणि अाता प्रसाद कांबळींच्या भद्रकाली प्राॅडक्शनने म...
-
‘अंधाराला अंधाराला, दिशा नाही मेली ठेचकळ्या आभाळाला, मलमपट्टी केली।। हात रंगल्याले, शेणाच्या रंगात कपिलेचा गंध येतो माझ्याही अंगात।।...





