मी त्याला शोधतोय जो घाणेरड्या फोटोशॉपच्या मदतीने शुभेच्छा संदेश बनवत बसलाय अाणि प्रत्येकाच्या मोबाईलवर भस्म्या झाल्यागत पाठवत सुटलाय. अशा लोकांची कल्पकता सकाळी सकाळी अत्यूच्च टोकावर असते का काय कोण जाणे ? सकाळी सकाळी मेसेज बॉक्स उघडला कि पुढिल प्रमाणे काही गोष्टी तुम्हाला दिसत असतील तर तुमची किव करावी तेवढी कमी अाहे.सकाळी सकाळी मोबईलमध्ये असा काही कलाविष्कार बघायला मिळणं म्हणजे किवच.
गुलाबाच्या दवामधुन उगवणारा सुर्य अाणि पिवळ्याचट्ट रंगात 'गुड मॉर्निंग' लिहलेलं , सुर्यफुलामध्ये प्रकाशमान झालेला अोम , कुठलीशी निरागस मुलगी अंगभर मोत्यांच्या माळा वागवतेय अाणि तिच्या हातात गुड अाणि पायात मॉर्निंग गोंदलंय , एखा्द्या मादक ललनेच्या अोठांच्या जागी गुलाब पाकळ्या फोटोशॉप केल्या अाहे अाणि तीच्या खडकावर झोपलीय त्या दगडांवर गुडमॉर्निंग लिहलंय. ह्या शुभेच्छा संदेशात गणपतीरायाचा जेवढा छळ झालाय तेवढा लहानपणी भावंडांच्या भांडणात कार्तिकाने सुद्धा केला नसेल. उंदराने हातात उचललेला गणपती, मारुतीने खांद्यावर उचलेला गणपती, गवताच्या पात्यांच्या थेंबामध्ये गणपती, गरुडावर बसलेला गणपती ,गाईच्या डोळ्यातल्या बुब्बुळामध्ये गणपती, डोंगराइतकी मोठ्ठी पिंड खांद्यावर उचलुन नेणारा गणपती अाणि असे बरेच सारे धन्य गणपती. शुभ सकाळ वगैरे ठिक अाहे.पण शुभ दुपार ,शुभ संध्या, रम्य रजनी हे जे काही कॉपीपेस्टियांचे खुळ सगळीकडे अाहे ते अत्यंत त्रासदायक अाहे. एखाद्या गोंडस बाळाच्या खुदूखुदू हसणा-या फोटोवर 'हेहेहेहे गुड नाईट नही कलोगे?" अरे हो बाबा नाही करणार अाणि ज्या उघड्याबाळावर जांभळ्या रंगाचा फॉंट अाहे त्याला तर नहीच कलुंगा मै.
समुद्राच्या फेसाळत्या लाटेवर शुभ अाणि शिंपल्यावर संध्याकाळ , सलमाननामक एखाद्या नटाच्या अश्रुतुन एखादी विश्वसुंदरी तरळतेय अाणि दिल है तो दुखेगा ही असा संदेश त्याने रात्रीच्या कोणत्या प्रहरी बनवुन एडिट केला असेल हे त्याच्या अोल्या उशीलाच माहित.
बरं असंही अाहे बरका कि रोज एक मेसेज गेलाच पाहिजे नाहीतर त्यांना वाटतं कि मेसेज न मिळालेल्या व्यक्तीला पोट साफ न झाल्या इतकी अस्वस्थता वाटत असेल. म्हणजे असं फक्त पाठवणा-यालाच वाटतं. याच्या रोजच्या दिनक्रमात ब्रशच्या अाधी शुभसंदेश धाडणे अाणि त्याच्या रोजच्या दिनक्रमात ब्रशच्या अाधी ते डिलीट करणे असं ठरलेलं असावं इतकं सगळं सवयीच. बरं एखादं सुंदर निसर्गचित्र , सुंदर पुतळा , सुंदर सुर्यास्त किंवा सुर्योदय किंवा पोर्णिमेचा चंद्र यांना गालबोट लावणारा बटबटीत फॉंट कुठून मिळत असेल बरं. तरी मी येताजाता लोकांच्या खिडकीतले बोर्ड बारकाईने वाचत असतो ह्याच अाशेने कि मला कधी तरी ' येथे सुंदर फोटे बटबटीत करुन मिळतील तसेच जिवाला घोर लाऊन मिळेल' हे वाचायला मिळेल.
No comments:
Post a Comment